भविष्य निर्वाह निधी मधून ना परतावा निधी मंजूर करणेकरिता लाच मागणाऱ्या तिघांवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
अमूलकुमार जैन- अलिबाग
तक्रारदार यांच्या भविष्य निर्वाह निधी मधून ना परतावा निधी मंजूर करणेकरिता आरोपी लोकसेवक यांनी तीन हजार रुपयांची लाच मागितली होती.सदर तक्रारदार हे त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी अलिबाग पंचायत समिती यांच्या इमारतीमध्ये असणाऱ्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या कार्यालयात तीन हजार रुपयांची लाच घेताना प्रशांत पांडुरंग तावडे,
राजेंद्र रामचन्द्र गायकवाड ,रुपेश सुभाष देशमुख
अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनावणे,पोलिस हवालदार अरुण करकरे, पोलीस हवालदार विनोद् जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील पोलीस नाईक,सचिन आटपटकर पोलीस नाईक जितू पाटील यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
रायगड जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी अथवा 9702706333 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.असे आवाहन रायगड लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनावणे यांनी केले आहे.