जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास जीवन सुखकर होते.
श्रीमती डॉ. निलम हातेकर यांचे प्रतिपादन
कुलदीप मोहिते कराड
डॉ. निलम हातेकर पुढे म्हणाल्या की, मन बिघडले की बुद्धी बिघडते. तेव्हा ईर्षा सोडून तंत्रज्ञानाच्या जास्त आहारी न जाता उद्याची उमेद निर्माण करावी, तसेच जीवनातील आव्हाने स्वीकारून जीवनातील आशावाद प्रबळ ठेवला की जीवन अधिक सुखकर होते."
अध्यक्षस्थानावरून संस्थेचे जनरल सेक्रेटरी . प्रकाश पांडुरंग पाटील (बापू) म्हणाले कि, "जीवनातील आशा अमर असते. जीवन सुखी करण्यासाठी आशावाद टिकवून ठेवावा. विविध गोष्टीं शिकुन प्रगती करावी. वेणूताईच्या आचार आणि विचाराचा जागर व्हावा म्हणून अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते या समारंभास वाय. बी. चव्हाण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कराडचे समन्वयक प्रा. डॉ. बी. एन. गोफणे, सहसमन्वयक प्रा. एस. व्ही. जोशी आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर प्रा. डॉ. आर. ए. केंगार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. सौ. एस. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. एस. आर. सरोदे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. कु. ईश्वरी देव हिने प्रारंभी ईशस्तवन सादर केले. व तिने सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराड व वेणूताई चव्हाण इंग्लिश मिडीयम स्कूल, कराड येथील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.