गावाकडे शेतीत राबणारा मुख्यमंत्री पाहिलाय का?
मुक्काम पोस्ट सातारा
मिलिंद लोहार
गेली पंधरा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी राहिलेले महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे गावाकडील साधे रूप अनेकांना माहीत नसेल पण मंत्री असतानाही सातत्याने गावाकडे संपर्क ठेवून आपली गावची शेतीवाडी करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला आहे. महाबळेश्वर जावळी तालुक्यातील दरे तर्फ तांब हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुळगाव. वयाच्या 18 व्या वर्षी ठाणे येथे उदरनिर्वाहासाठी जाऊन सुरुवातीला रिक्षा चालवणारा हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं पण आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर हे पद मिळवून त्यांनी कष्ट करायची तयारी असेल तर सर्वसामान्य व्यक्ती ही यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
गतसाली याच दिवसात मुख्यमंत्री गावाकडे भात लावण्याच्या कामात व्यस्त दिसत होते, त्यानंतरही आपल्या घराशेजारील हळदीची शेती असेल किंवा परिसरातील झाडे असतील यामध्ये सातत्याने रममान झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोयनाकाठचा अभिमान झाले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे हे अनोखी रूप आपणास पहावयास नक्कीच आवडेल.