पेठांबे गावात कृषी दिना निमित्त वृक्षदिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
महाराष्ट्र मिरर टीम - चिपळुण
कृषी दिन हा विविध उपक्रमांनी साजरा केला जातो. चिपळुण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय खरावते(दहिवली)यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2022- 23 अंतर्गत कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाने पेठांबे गावात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण व वृक्षदिंडीचे आयोजित करुन गावातील शेतकऱ्यांना कृषी दिनाचे महत्त्व पटवुन देण्यात आले.
या गावातील शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध शेती पिकांची माहिती व पिकसंवर्धन याबाबत कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी वैभव पवार, मयुर वाघ, निहाल ठाकरे,कौतुभ दळवी, प्रथमेश खटावकर या विद्यार्थ्यांनी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी सरपंच पुर्वीताई जाधव, उपसरपंच शशिकांतराव शिंदे, ग्रामसेवक व्ही.बी. गुरव, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक खानसर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा रुतृजा शिंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.