वर्ल्ड रँकींगमध्ये सांगली जिल्ह्याच्या दिव्यांग खेळाडूनी मारली बाजी
वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्समध्ये संदीप सरगरने सुवर्ण पदक तर सचिन खिलारेने रौप्य पदक जिंकले : २५ देश सहभागी
उमेश पाटील - सांगली
आफ्रिकेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ट्यूनिशिया शहरात झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स 2022 स्पर्धेत भारताकडून सांगली जिल्हा आटपाडी तालुक्यातील करगणी गावच्या सुपुत्र संदीप सरगर या दिव्यांनी खेळाडूने भालाफेकमध्ये मिळविले सुवर्ण पदक तर त्याच क्रांती गावच्या दिव्यांग खेळाडू सचिन खिलारे याने गोळा फेक प्रकारात रौप्य पदक पटकाविले. या स्पर्धेमध्ये २६ देशाचे स्पर्धक दिव्यांग खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
संदीप सरगर हा वर्ल्ड रँकमध्ये 2 तर,सचिन खिलारे हे वर्ल्ड रँकमध्ये 4 थे स्थान पटकाविले आहे.
वर्ल्ड रँकींगमध्ये दिव्यांग खेळाडूंचा मान प्रथमच सांगली जिल्ह्यातील या दोन जिगरबाज दिव्यांग खेळाडूंनी मिळविला आहे.संपुर्ण महाराष्ट्रात कौतूक होत आहे. या दोन करगणी गावच्या दिव्यांग खेळाडू सुपुत्रांचे करगणी गावात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले.
या दोन जिगरबाज, जिद्दी दिव्यांग खेळाडूंना कॉमनवेल्थ मेडलीस्ट सुभेदार काशिनाथ नाईक, नॅशनल कोच निरज चोप्रा, पॅरा ऑलिंपिक स्पोर्टस महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकिशोर नाळे, सांगलीचे क्रीडा अधिकारी व पदाधिकारी तसेच सांगली पॅरा ऑलिंपिक स्पोर्टस असोसिएशन सांगलीचे रामदास कोळी व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन मोलाचे लाभले.