उंब्रज ता कराड गावचे सुपुत्र परेशकुमार कांबळे भगतसिंग युथ ब्रिगेड नॅशनल 2022 पुरस्काराने सन्मानित
कुलदीप मोहिते कराड
रक्तदान आणि समाजातील अनेक लोकाना वेळेवर रक्ताची मदत मिळावी म्हणून मदत रक्ताची संघटना ही कायम पुढे असते , कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना रक्ताची मदत करून जीवनदान देण्याचे काम या संघटनेमार्फत केले गेले आहे
मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष परेशकुमार कांबळे यांनी विविध समाजकार्यात मदत रक्ताची या संघटनेमार्फत केलेल्या कार्यात आपला ठसा उमटवला आहे,
त्यांच्या या निस्वार्थ सेवेसाठी विविध स्तरातून राज्यातून त्यांना अनेक पुरस्काराने ही सन्मानित केले गेले आहे ,
हा पुरस्कार माझ्या मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र मधील सर्व रक्तदात्यांचा असून मी सर्वांचा प्रतिनिधी म्हणून हा पुरस्कार स्वीकारला तसेच प्रत्येक तरुणाने पुढे येऊन रक्तदान करावे असे आव्हान ही त्यांनी पुरस्कारा दरम्यान केले समाजातील विविध स्तरातून मदत रक्ताची संघटना व परेश कुमार कांबळे यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे निश्चितच त्यांच्या या पुरस्काराने सातारा जिल्हा व उंब्रज गावची मान उंचावेल यात शंका नाही बिहार मधील जेष्ठ समाजसेविका गीत देवी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला यावेळी गयाचे खासदार विजयकुमार गया जिल्हा पोलीस अधीक्षक इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये 15 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला