चुलत्यानेच केला विश्वासघात चॉकलेटच्या बहाण्याने भावाच्या 1 वर्षाच्या मुलाला विहीरीत टाकले
भावा भावाच्या नात्याला काळिंबा लावणारी घटना
महाराष्ट्र मिरर टीम - सातारा
साताऱ्यात देगाव येथे 1 वर्षाच्या बाळाला चुलत्याने विहरित टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये... आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये..
सातारा एमआयडीसी कॅनॉल जवळ असलेल्या दत्तनगर येथील विहरित चुलत्याने बाळाला विहरित टाकून दिले आहे.. शलमोन मयूर सोनवणे असे मृत बाळाचे नाव आहे.. संशयित आरोपी अक्षय मारुती सोनवणे याने हे कृत्य केलं असून घरगुती वादाच्या करणातून त्याने बाळाला विहरित टाकले असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.. चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याला घरातून नेत हे अमानुष कृत्य केलं आहे.. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून बाळाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी सातारा तालुका पोलीस दाखल झाले असून या घटनेचा तपास करत आहेत..