जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज तालुका कराड यांच्यावतीने खाऊचे वाटप
कुलदीप मोहिते - कराड
स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था उंब्रज यांच्या वतीने दर साल बाद प्रमाणे जागृती आश्रम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उंब्रज येथे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले सकाळी ध्वजारोहणानंतर संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या मार्फत जागृती आश्रम प्राथमिक व माध्यमिक विद्यालय उंब्रज येथील प्रत्येक विद्यार्थ्याला बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले
जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्था नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवत असते निश्चितच दिव्यांग बांधवांचे हे काम प्रशंसनीय आहे यावेळी कार्यक्रमास उपस्थित जनकल्याण दिव्यांग बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष रमेश जाधव संस्थेचे सचिव प्रमोद गायकवाड सदस्य दीपक खडंग अरविंद जाधव महेश काशीद दिगंबर भांदिर्गे उमेश शेटके सागर स्वामी जागृती आश्रम विद्यालयाचे सचिव कुंदन चव्हाण मुख्याध्यापक माध्यमिक बाबर सर प्राथमिकचे मुख्याध्यापक पाटील सर व शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते तसेच विद्यालयाच्या मार्फत संस्थेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा श्रीफळ देऊन सत्कार ही करण्यात आला