Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

येणके ता कराड गावचा आधुनिक निर्णय 75 विधवा माता भगिनींनी फडकवले 75 ध्वज

 येणके ता कराड गावचा आधुनिक निर्णय 75 विधवा माता भगिनींनी फडकवले 75 ध्वज

या ऐतिहासिक निर्णयाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये नाव नोंद होण्याची शक्यता ?

कुलदीप मोहिते कराड

कराड तालुक्यातील येणके या गावात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अर्थात 75 वा स्वातंत्र्य दिन गावातीलच 75 विधवा माता भगिनींच्या हस्ते 75 ध्वज फडकवून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने सावित्रीच्या लेकींना मानसन्मान देण्यात आला. या यापुढे गावातील विधवा महिलांना विधवा असे न संबोधता त्यांचे  " संघर्ष भगिनी महिला" असे नामकरण ही करण्यात आले.

     पती निधनानंतर प्राप्त झालेल्या वैधव्यामुळे जीवनातील आनंद हिरावून गेलेल्या  विधवा महिलांनी आज स्वतःच्या हस्ते 75 ध्वज फडकवल्याने त्यांच्या चेहऱ्यावर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद दिसून येत होता. आजपर्यंत विधवा भगिनींच्या हस्ते कधीही ध्वजारोहण झाल्याचे ऐकिवात नसल्याने या अमृत महोत्सवानिमित्त आमच्या हातून ध्वजारोहण करून आम्हाला जो सन्मान दिलात त्याबद्दल जीवन कृतार्थ झाल्याच्या भावना डोळ्यातील ओघळणारया आनंदाश्रू बरोबर विधवा भगिनींनी व्यक्त केल्या.

भारत देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामध्ये सर्वाधिक शहीद झालेले जवान सातारा जिल्ह्यातील आहेत . सातारा जिल्ह्याला  स्वातंत्र्यसंग्रामाच्या मातीचा गंध आहे .याच जिल्ह्यातील कराड तालुक्यातील येणके हे तीन हजार लोकसंख्या असलेले निसर्ग संपन्न, बळीराजाचे  गाव आहे .तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावांमध्ये सर्वेअंती एकूण 137 विधवा महिला आढळून आल्या. महाराष्ट्रातील काही मोजक्याच गावांनी विधवा प्रता बंद करण्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र येणके गावातील ग्रामसेवा सार्वजनिक प्रतिष्ठान ,ग्रामपंचायत येणके व सर्व ग्रामस्थ यांनी एक पाऊल पुढे जाऊन या स्त्रियांना केवळ हळदीकुंकवाचा मान न देता, भारत देशाची अस्मिता असणाऱ्या तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण करण्याचा मान दिला.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 विधवा महिलांच्या हस्ते 75 ध्वज फडकवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि तो आज 15 ऑगस्ट रोजी सत्यात उतरवला. सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी विधवा विरोधी प्रथांना कडाडून विरोध केला होता. त्यांच्याच कार्याचा वसा आणि वारसा जोपासत येणके गावातील ग्रामस्थांनी विधवा प्रथा बंदी तर केलीच .मात्र विधवा प्रता बंदीची सुरुवात विधवा महिलांना 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 75 ध्वज फडकऊन करण्यात आली. विधवा भगिनिंना सन्मान दिल्याने  खऱ्या अर्थाने या महिलांना स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद प्राप्त झाला. समाजातील काही अनिष्ट प्रथेमुळे विधवा महिलांना आपल्या उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो .पती निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसले जाते ,बांगड्या फोडल्या जातात, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधवांना योग्य मान दिला जात नाही. अशा अनेक रूढी परंपरा प्रथा समाजात आजही रूढ आहेत. अशा प्रकारामुळे कर्तबगार स्त्रिया सुद्धा नाराज होतात. सहन न होणारे दुःख पचवतात . आपलं जीवन समाजाच्या अवहेलनारूपी बुक्क्यांचा मार सहन करत जगत असतात .खरंतर पतीच्या निधनानंतर याच महिला भगिनी मोठ्या धाडसाने आपल्या कच्च्या-बच्चा मुलांना अतोनात कष्ट करून शिक्षणाचे धडे देतात.मोठे करूण स्वतःच्या पायावरती उभे करतात. प्रचंड संघर्ष करतात. प्रचंड दुःखाचा डोंगर समोर असताना सुद्धा या महिला एकाएकी राहूनही आपल्या कुटुंबासाठी अहोरात्र झटत असतात .मग अशाच महिलांना स्वतः काबाडकष्ट करून कुटुंब उभे करणाऱ्या महिलांना समाजामध्ये मानाचे स्थान का दिले जात नाही .हीच प्रथा बदलण्यासाठी येणके गावातील ग्रामसेवा सार्वजनिक  प्रतिष्ठान ,ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ यांनी विधवा प्रताविरोधी ठोस निर्णय घेतला .आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विधवा  माता-भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 

सकाळी सात वाजल्यापासून या महिला भगिनींची ध्वजारोहण करण्यासाठी लगबग सुरू होती. तरूण भगिनीपासून अगदी  80 ते  90 वर्ष  वयातल्या वृद्ध महिला  लटपटणारी पाऊलं व थरथरणारे हात घेऊन जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाकडे मोठ्या उत्साहाने , देश प्रेमाने जमा  होत होत्या .आजपर्यंत विधवांनी  भोगलेला त्रास ,अनिष्ठ रूढी - परंपरा खाली दबलेला त्यांचा श्वास आज  मोकळा होणार होता  हे त्यांना दिसून येत होते.डोक्यावरती भगवा फेटा, गळ्यामध्ये तिरंग्याची सुंदर शोभिवंत शाल ,आणि उजव्या हातामध्ये भारताची अस्मित असणाऱ्या तिरंग्याची दोरी हे सर्व अघटित मात्र मनाला भरभरूण आनंद देणारे पाहून स्त्रियांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे उधान आले होते. समाजामध्ये एवढा मोठा मान देणारे मोठ्या मनाचे ग्रामस्थ आहेत याची जाणीव त्यांना झाली. काही कारणामुळे आमचे पती आम्हाला सोडून गेले, आम्ही  जीवन एकाकी  जगलो. मात्र यापुढे हे आमचे दुःखी जीवन संपवून आम्ही आनंदी जीवन जगणारा आहोत याची चाहूल त्यांना लागून गेली.

वांग नदीच्या तीरावरती निसर्ग संपन्न वातावरणामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे. शाळेच्या  मैदानावरती गेली चार दिवसापासून या विधवा भगिनींच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ  करण्याची जय्यत तयारी सुरू होती. यासाठी गावातील ग्रामसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी ,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी , अशा महिला ,बालवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक ,तरुण मित्र ,ग्रामस्थ ,गावातील महिला, युवती, विकास सेवा सोसायटीचे पदाधिकारी झटत होते. सकाळी नऊ वाजून 35 मिनिटांनी अख्खा गाव हा ऐतिहासिक ध्वजारोहण समारंभाचे साक्षिदार होण्यासाठी  शाळेच्या प्रांगणामध्ये एकत्र आले होते . मैदानावरती अत्यंत सुंदर रित्या 75 ध्वजांची उभारणी करण्यात आली होती.  भारताची अस्मिता असणारया तिरंग्याला  ज्या वेळेला राष्ट्रीय सलामी दिली. त्यावेळी  प्रत्येक विधवा भगिनीच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसून येत होता.यावेळी कराडच्या  टिळक हायस्कूलच्या विद्यार्थी व संगीत शिक्षकांनी राष्ट्रगीत म्हटले देशभक्तीपर दोन गीते सादर केली. आणि सर्व ग्रामस्थ व  विधवा महिला भगिनींनी आकाशाला गवसणी घालणारया  भारतीय स्वातंत्र्याचा विजय असो ,जय जवान जय किसान, बोला भारत माता की जय, वंदे मातरम, अशा विविध घोषणा दिल्या आणि संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

       कधी विचार ही केला नसताना स्वतःच्या हस्ते ध्वजारोहण झाल्याचा आनंद  अनेक विधवा भगिनींना व्यक्त केला. या प्रसंगामुळे खऱ्या अर्थाने आम्हाला जीवनामध्ये समर्थपणे जगण्याची ,  संघर्ष करण्याची ताकद निर्माण झाली आहे. आम्हास एक नवसंजीवनी प्राप्त झाली आहे .यापुढे समाजामध्ये ,गावामध्ये आमचा मान सन्मान होईल आम्हाला कोणीही विधवा म्हणून हिणवणार नाही ,आम्हाला प्रत्येक सण समारंभ व विविध कार्यक्रमासाठी आवर्जून गाव बोलावले आणि आम्हालाही त्यांच्या आनंदामध्ये सामावून घेतील याचा आम्हा सर्व महिला भगिनींना प्रचंड आनंद झाल्याच्या भावना कित्येक महिलांनी हात जोडून व्यक्त केल्या .हात जोडत असताना अनेक महिला भगिनींच्या गहिवरूण आले होते . डोळ्यातून आनंदाश्रू टिपत त्या भावना व्यक्त करत  होत्या.गावानं आमच्यासाठी खूप काहीतरी वेगळं केलं याचा समाधान आम्हाला असल्याच्या भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या.

या अमृत महोत्सवी ध्वजारोहण प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती आप्पासाहेब गरुड, सरपंच सौ.निकहत मोमीन, उपसरपंच नीलम गरूज सर्व सदस्य ,ग्रामसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राध्यापक एस .के .पाटील , उपाध्यक्ष दादासाहेब कदम , प्रतिष्ठानचे संस्थापक सचिव भरत कदम,सेवानिवृत्तअभियंता सुनिल गरूड, एम एन गरुड ,तंटामुक्तीचे अध्यक्ष दिनकर गरुड ,उपाध्यक्ष जगन्नाथ गरुड. धनंजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील , राहुल गरुड ,राहुल पाटील ,अजय पाटील,आनंदा गरुड ,रूपाली पाटील,ग्रामसेवक सीमा माने ,अशा सेविका मनिषा गरुड वैशाली जाधव, जिल्हा शाळेच्या  मुख्याध्यािपका रूपाली कुराडे ,काटू सर  ,संग्राम पवार, अंगणवाडी सेविका ,आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच पोतलेच्या आनंदराव चव्हाण विद्यालय मुख्याध्यापक पवन पाटील सर्व शिक्षक व  विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कराडच्या टिळक हायस्कूलच्या संगीत शिक्षिका सौ .संगीता काणे ,श्री सतीश काणे ,प्राध्यापिका सौ. सुखदा विदार व टिळक हायस्कूलच्या  विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ,ध्वजगीत व देशभक्तीपर  गीते सादर केली. ग्रामसेवा  प्रतिष्ठानचे सचिव भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले.सोसटीचे माजी चेअरमन धनंजय पाटील यांनी खाऊ वाटप केले.

महाराष्ट्रामध्ये पतिनिधनानंतर स्त्रियांना विधवा  म्हणून ओळखले जाते .विधवा याच शब्दाने अनेक महिलांना हिणवलेही जाते .हे बदलण्यासाठीच यापुढे गावातील विधवा महिलांना विधवा हा शब्दप्रयोग न वापरता "संघर्ष महिला भगिनी" असे त्यांचे नामकरण करण्यात आले .त्यामुळे विधवा महिलांना विधवा हा शब्द वापरून  हिनवणे थांबऊन "संघर्ष महिला भगिनी" नामकरण करूण  असेच त्यांना  संबोधले जाईल असा याप्रसंगी ग्रामस्थांनी एकमुखी ऐतिहासिक निर्णय घेतला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies