उंब्रज-येथील रणधिर मोहिते यांची उंच भरारी..
कुलदीप मोहिते- कराड
सातारा जिल्ह्यातील अनेक जण स्वकरूत्वावर परदेशात जाऊन नाव कमावतात त्यापैकीच एक,उंब्रज-येथील रणधिर उत्तमराव मोहिते,त्यांची आज कुवेत येथील जगातील सर्वात मोठ्या नामांकीत अशा रिफायनरी कंपनी- कुवेत नॅशनल पेट्रोलियम कंपनीमध्ये असिस्ट॔ट मॅनेजर पदी निवड झाली,त्यांनी B.E.Instrumentation मध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर ,रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मध्ये आठ वर्षे मॅनेजर म्हणून काम केले,रिलायन्सने त्यांना इटली येथील जगातील सर्वात नामांकीत अशा Florence learning centre व Enbridge Gas Company कॅनडा या ठिकाणी ट्रेनींग दिले,याच जोरावर आज त्यांची ही निवड झाली,मा.प्राचार्य उत्तमराव बाबुराव मोहिते यांचे ते चिरंजीव व जागतिक किर्तीचे कॅन्सर तज्ञ डाॅ. उन्मेष भैय्या मोहिते व साई मेडिकल फाऊंडेशन &चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य चे संस्थापक-अध्यक्ष शैलेश मोहिते ,व आंतरराष्ट्रीय कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी नितेष मोहिते यांचे ते चुलत बंधु आहेत,रणधिर यांची पत्नी सौ.शुभांगी व भाऊ कुलदीप हेही उच्चशिक्षित असुन बहिण सौ.माधुरी मोहिते-कदम ह्या आदर्श शिक्षिका आहेत,तसेच भाऊजी श्री. भरत कदम सर हे टिळक हायस्कूल कराड चे आदर्श शिक्षक व उत्कृष्ट सुत्रसंचालक आहेत,संपूर्ण मोहिते कुटुंब उच्चशिक्षित असुन समाजकार्यात सक्रीय असतात...या यशाबद्दल रणधिर यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले