घर आणि शहरासह मनातील कचरा दूर करण्याची शिकवण तीर्थरूप डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांची
कर्जत पालिकेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांचे प्रतिपादन
ज्ञानेश्वर बागडे -कर्जत
घर आणि शहरासह मनातील कचरा दूर करण्याची शिकवण तीर्थरूप डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्याला निरूपणाद्वारे दिली असून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त या अभियानात आपला सहभाग नोंदवता आला ही भाग्याची गोष्ट असून ही सद्गुरू कृपा असल्याचे प्रतिपादन पालिकेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित 'स्वच्छता अभियानात' केल.
यावेळी माजी उपसभापती मनोहर थोरवे,कर्जत नगरपालिकेचे नगरसेवक.नगरसेविका,श्रीसदस्य भगवान भोसले ,पालिका प्रशासनातील कर्मचारी अधिकारी आणि श्री बैठकीतील 900 सदस्य यावेळी उपस्थित होते.
श्री.बैठक वावलोळी, पोसरी,मुद्रे,सावळा, कशेले, बार्णे, दहिवली,वदप,भिवपुरी, गौळवाडी, पाथरज,भिसेगाव,गुडवण,खांडपे, तमनाथ, चाफेवाडी,पिंगळस आदी ठिकाणचे 900 हून अधिक श्रीसदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.यावेळी 120 टन् कचरा कर्जत शहरातून उचलण्यात आला.या स्वच्छता अभियानाची सुरुवात नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.