Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

महायुतीत जागा वाटपावर राष्ट्रवादीची "दादागिरी"

महायुतीत जागा वाटपावर राष्ट्रवादीची "दादागिरी"

संतोष दळवी -कर्जत

महायुतीत जागा वाटपात  अजितदादा पवार गटाचा वरचष्मा राहण्याची शक्यता वर्तवली जात असून  आचारसंहिता अगदीच तोंडावर आल्याने पितृपक्षानंतर महायुतीचे जागा वाटप झालेले असेल .बहुतांश  अंतर्गत जागा वाटप झालेले असेल तरी  पन्नास ते साठ जागेवर तिढा कायम आहे.हा तिढा अमित शहा यांच्या "शाही " तोडग्याने  निकाली निघणार आहे. दिल्लीश्वराना कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र विधानसभा  भाजपला आपल्या ताब्यात घ्यायची आहे.. शाही तोडग्यात आयत्यावेळी  शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या जागेत काटछाट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.लोकसभेचा  स्ट्राइक रेट आणि  विजयाची क्षमता  लक्षात घेता भविष्यात राष्ट्रवादीला  जेमतेम जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून  भाजपचे काही जहाल  वक्तव्य   करणाऱ्या नेत्यांवर टीका करण्याचे काम राष्ट्रवादी पक्ष करताना दिसत आहे. वेळप्रसंगी दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री  अजित पवार   भाजप मधील जहाल नेत्यांचे कान टोचत असतात. दरम्यान दिल्ली दरबारी यासंदर्भात  तक्रारी केल्या जात असल्या तरी  भाजप सर्व्हेत,भाजपची पिछेहाट होत असल्याने महायुतीसाठी मतदार यांचा कौल नसल्याचे 
ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला राष्ट्रवादीची साथ सोडण परवडणार नसून सर्व्हेत भाजपला घवघवीत यश मिळत असत तर राष्ट्रवादीला महायुती तून कधीच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असता शिवाय लोकसभेला सुमार कामगिरी  पाहता फक्त रायगडची एक जागा राखत राष्ट्रवादीची आब राखली आणि विधानसभेला ८० ते ९० जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत मात्र भाजप पेक्षा पण अधिक स्ट्राईक रेट असलेल्या शिवसेनेला (शिंदे गट)किती जागा हव्यात हे मात्र अजून समजू शकल नाही. एक खासदारामागे ८० ते ९० जागांची मागणी केली जात असेल तर महायुती तील घटक पक्ष यांनी किती जागा  मागाव्यात  हे अनाकलनीय असल्याने  राष्ट्रवादीकडून महायुतीत अजित पवार गटाची जागा वाटपात दादागिरी असल्याचे बोलल जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies