रायगडात "शेठ" नावाचं प्रस्थ
(निवडणूक विधानसभेची - संतोष दळवी)
रायगड जिल्ह्यात सध्या शेठ नावाची भलतीच क्रेझ आहे.ग्रामपंचायत निवडणुकीपासून ते थेट लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीपर्यंत हे असे अनेक शेठ निवडणूक लढतायेत आणि कमी अधिक फरकाने निवडून सुध्दा येतायेत.
"शेठ" नावाचा इतिहास
शेठ नावाला इंग्रजांची किनार आहे.जगत नावाचे मोठे उद्योजक होते.
ब्रिटिश त्यांचे कडून व्याजाने पैसे घ्यायचे तिथपासून या जगत शेठ नावाला सुरुवात झाली मात्र सध्या या शेठ या नावाला रायगड जिल्ह्यात आदर आहे.ज्याच्याकडे पैसा अडका आहे आणि त्यातील चिमूट भर पैसा पब्लिक वर खर्च केला की तो त्या परिसराचा शेठच झाला म्हणून समजा.१९९८ सालापासून रायगडात घरोघरी ते गल्लोगली आणि दिल्ली पर्यंत हे शेठ पोहचले आहेत. १९९८ साली रामशेठ ठाकूर यांनी माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांचा पराभव केला आणि तिथपासून हे शेठ प्रत्येक क्षेत्रात रायगड जिल्ह्याच्या क्षितिजावर चमकू लागले .मग तिथपासून ग्रामपंचायत सदस्य सुध्दा शेठ झाला.आता हा शेठ शब्द विधानसभा सदस्यांच्या नावानंतर लागून राहील आहे.
गावागावात कोणी गाडी ,बंगलाच काय तर अगदी बैलगाडा शर्यतीत बैल पळवले की झाला तो शेठ इतकंच काय गळाभर सोने घातलं की मग अशा या शेठ शब्दाने नादच पुरा केल्याचं बोललं जातं.