कर्जतच्या सांगवीत रायगड पोलिसांनी केला 5 कोटीचा मुद्देमाल जप्त
बनावट सिगारेट फॅक्टरीवर रायगड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई,
5 कोटीचा मुद्देमाल जप्त, आंतरराज्यीय 15 आरोपी अटक.
महाराष्ट्र मिरर टीम कर्जत
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे
शाखा रायगड याना गोपनीय माहीती प्राप्त झाली की, मौजे साांगवी गावचे हद्दीत अब्बास नावाच्या
फॉर्म हाउसवर सिगारेट बनवणारी बनावट फॅक्टरी मोठया प्रमाणावर सिगारेट बनवुन वेगवेगळया
ठीकाणी वितरीत के ली जाते. सदरची गोपनीय माहीती प्राप्त होताच पोलीस निरीक्षक बाळासाहेब
खाडे, यांनी सदरची माहीती पोलीस अधीक्षक सोमनाथ घागे रायगड याांना दिली, त्यानंतर स्थानिक
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे हे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप-निरीक्षक लिंगप्पा
सरगर, सहा.फौ.संदीप पाटील, सहा.फौ.राजेश पाटील, पोह/ झेमसे,पोह/ मोरे, पोह/
सावंत, पोह/ म्हात्रे, पोह/ मुंढे यांच्या पथकाने सांगवी येथे नदीच्या कडेला असणा-या आलीशान फॉर्मवर धाड टाकली.
या फॉर्म हाउसला भक्कम तटबंदी व उंच असलेले कंपाऊंड पोलिसांना आढळुन आले. सदर कंपाऊंड मोठे दरवाजे आतुन बंद आढुळन आल्याने पोलिसांनी दरवाजे उघडण्यासाठी आवाज दिला परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने काही पोलिसांनी पाठीमागील नदीच्या बाजुकडुन कंपाऊंडवरून
आतमध्ये प्रवेश केला, पोलीसाना पाहुन आतील एक कामगाराने त्यानंतर दरवाजा उघडला,
पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक सरगर सहा.फौ.संदीप पाटील,
सहा.फौ.राजेश पाटील, पोह/ झेमसे,पोह/ मोरे, पोह/सावंत, पोह/ म्हात्रे,
पोह/ मुंढे याांनी आतमध्ये जावुन पाहणी के ली असता, एक मोठया गाळयामध्ये गोल्ड प्लॅग
कंपनीच्या नावाचे सिगारेट निर्मिती करीत असलेले मोठ-मोठया मशीनवर 15 कामगार आढळुन
आले. सदर वेळी कारखान्याची पाहणी केली असता मोठया प्रमाणावर सिगारेट निर्मिती
करण्याकरीता लागणारी प्रोसेस केलेली मिश्रीत सुगंधीत तंबाखु मोठया प्रमाणावर आढळुन आली.
सिगारेट बनवण्याकरीता लागणारा कागद,पॅकिंग करण्याकरीता लागणारे बॉक्स, सिगारेट पॅक
करण्याकरीता लागणारे पॅकेट व इतर सर्व संबधित साहीत्य व सिगारेट तयार करणा-या मोठमोठया
सेमी अटोमॅटिक 3 मशीन त्यावर सीगारेटची निर्मिती के ली जात होती. सदर निर्माण केलेली सीगारेट
पॅकेटमध्ये पॅक करून पॅकेटचा बॉक्स व सदर बॉक्सचे मोठे कॅरेट पॅक के लेले मोठया प्रमाणावर
आढळुन आले. सदरवेळी कामगाराकडे सिगारेट निर्मीतीबाबत आवश्यक परवाने असल्याबाबत
विचारणा के ली परंतु त्याांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने अथवा माहीती प्राप्त झाली नाही.असं पोलिसांनी सांगितलं त्यामुळे गोल्ड प्लॅग कंपनीच्या नावाने सि गारेट बनवणारा बनावट कारखाना असल्याचे निष्पन्न झाले.
संबधित माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आली , त्यांनी घटनास्थळी भेट दि ली व कारवाईबाबत सुचना दिल्या. त्यानंतर
सिगारेटचा माल, सिगारेटला बनवण्याकरीता लागणारे मटेरियल,
लागणारे साहीत्ये याचे मोजमाप करण्यात आले त्यावेळी
1) 2,31,60,000/- रू.किंमतीच्या तयार केलेल्या सिगारेट.
2) 15,86,900/- रू.किंमतीचे सिगारेट करण्याकरीता लागणारे मटेरियल.
3) 2,47,00000/- रू.किंमतीचे सिगारेट तयार करण्याकरीता लागणा-या मशीनरी.
असा एकु ण 4,94,46,960/- रू.किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बनावट कारखाना चालवणारे वेगवेगळया राज्यातील एकु ण 15 आरोपी विरूध्द कर्जत पोलिसात गुन्हा दाखल करून अटक ही करण्यात आली.
सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे याांच्या आदेशान्वये स्थानिक
गुन्हे शाखा करीत आहेत. सदर तपासादरम्यान सदर कारखान्याचा मालक, जागेचा मालक, सिगारेट
बनवण्याकरीता लागणारे मटेरियल कुठून आले, तयार केलेली सिगारेट कुठे-कुठे वितरीत करण्यात
आली याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे.