Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

अखेरपर्यंत लाडक्या भावांनी लाडक्या बहिणीला पालकमंत्रीपदापासून ठेवलं वंचित !!!

अखेरपर्यंत लाडक्या भावांनी लाडक्या बहिणीला पालकमंत्रीपदापासून ठेवलं वंचित !!!

संतोष दळवी - कर्जत

२०१९सालच्या विधानसभा निवडणुका पार करून आघाडी सत्तेत आली.सत्तेत सहभागी झालेले पक्ष होते अखंड शिवसेना आणि अखंड राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष.त्यावेळी रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आणि राष्ट्रवादीचा एकमेव एक आमदार होते.मात्र सत्तेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील तीन आमदारांनी मंत्रीपदासाठी फिल्डींग लावली पण त्यांचा मुख्यमंत्री असून मंत्रीमंडळात वर्णी लागू शकली नाही.आतून नाराजीचा सूर असला तरी उघडपणे बोलू शकत नव्हते कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने शिवाय पक्षाची मुख्य जबाबदारीही होती.इकडे  राष्ट्रवादीत एकमेव आमदार असलेल्या अदिती तटकरे मंत्रीही झाल्या आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्या.तरीही राजकारण शांत होत जिल्हा नियोजन समितीत अनेक विकासकामांवरून खडाजंगी सुरू झाली.विकासकामे ऐवजी तीन आमदार विरुध्द पालकमंत्री असा वाद रायगडच्या राजकारणात अधिक चर्चिला जाऊ लागला.नंतर नंतर शाब्दिक चकमक सुरू झाल्या  शिवसेनेत बंड झालं सरकार गडगडल मुख्यमंत्र्यांना स्वतः हून पाय उतार व्हावं लागलं.पुन्हा शिंदे गट शिवसेना आणि भाजप सत्तेत आले.तरीही शिंदेच्या बंडात अग्रभागी असलेल्या तीन आमदारांपैकी एकालाही मंत्रिपद मिळाले नाही पुन्हा  घोर निराशा पदरी आली. रायगड जिल्ह्याला जिल्हा सोडून बाहेरचा पालकमंत्री मिळाला.वाद बऱ्यापैकी शमला असताना पुन्हा एकदा  बंड झालं तेही राष्ट्रवादीत. राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली  आणि महायुतीचे सरकार सत्तेत बसलं त्यात रायगडच्या एकमेव असलेल्या आमदार अदिती तटकरे मंत्री झाल्या रायगडाकरांना वाटलं की मंत्री आदिती तटकरे पुन्हा पालकमंत्री होतील.मात्र महायुती सरकारची मुदत संपत आली तरी या तीन आमदारांनी तटकरे यांना पालकमंत्री होऊच दिलं नाही.आता विधानसभेची निवडणूक अगदी तोंडावर आल्याने महायुती सरकार लाडक्या बहीण योजनेचा इतका प्रचार आणि प्रसार करत आहे की या लाडक्या बहिणी विधानसभेला महायुतीतील भावांना मदत करतील अशी अटकळ बांधली जात आहे.दरम्यान या तीन लाडक्या भावांनी  लाडक्या बहिणीला पालकमंत्री पदापासून वंचित ठेवल्याने रायगड जिल्ह्यात महायुतीतील या दोन घटक पक्षांत सर्व काही आलबेल नसल्याचे बोललं जातंय.याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला म्हणजे रायगड जिल्ह्यातील काहीभाग मावळ लोकसभेत येतो तर काही भाग रायगड लोकसभेत येतो आता रायगड लोकसभेत महाडचे उदाहरण घेतलं तर लोकसभेला राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांना फक्त महाड मध्ये शिंदे शिवसेनेचं आमदार गोगावले असताना फक्त ३५०० मतांची आघाडी आहे तर मावळ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना कर्जत विधानसभा संघात उबाठा गटापेक्षा कमी मतदान झालं.आणि यानिमित्ताने राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीतील घटक पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.या सगळ्या राजकीय वादाची किनार पाहता महायुतीतील या दोन पक्षांनी एकमेका विरोधात दंड थोपटले आहेत.आता विधानसभेत एकमेकांचे काम कसे करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies