संतोष दळवी - कर्जत
रायगड जिल्हा मनसे अध्यक्ष असलेल्या जितेंद्र पाटील यांना त्यांच्याच कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात मनसेचा उमेदवार न देण्याची नामुष्की ओढवली असल्याने मनसेची एकूण कर्जत खालापूर तालुक्यात किती मतदान आहे हे समजण्यास वाव नाही.
खळखट्याक करणाऱ्या मनसेला कर्जत मध्ये नशीब अजमवायला उमेदवार नसल्याने अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मनसेचे संभाव्य उमेदवार निरगुडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने दोन वेळा उमेदवारी केले जग्गनाथ पाटील यांना २७ तारखेला उमेदवारी घोषित होऊन AB फॉर्म मिळाला होता. प्रांत कार्यालयाच्या पोहचलो असताना फॉर्म भरण्याची वेळ संपली अशी घोषणा करण्यात आली . तुम्ही काही आक्षेप घेतला का?या प्रश्नावर जग्गनाथ पाटील महाराष्ट्र मिररशी बोलताना म्हणाले हे काम जिल्हाध्यक्ष यांचे होते असे सांगून त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.दरम्यान त्यांना २७ तारखेला रात्री उशिरा AB फॉर्म मिळाला तर २८ तारखेला फॉर्म भरायचा होता मात्र काही कारणास्तव भरला नाही .२९ तारखेला फॉर्म भरायला आलो मात्र वेळेअभावी फॉर्म भरता आला नाही असं जग्गनाथ पाटील यांनी सांगितले.
याबाबत जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्याशी अनेकदा दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र कॉल त्यांनी रिसिव्ह न केल्याने त्यांची यामागची भूमिका समजू शकली नाही.