Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

तटकरेंनी केली घारेंची गोलीगत फसगत

तटकरेंनी केली घारेंची गोलीगत फसगत
संतोष दळवी - कर्जत
मी प्रचंड आशावादी म्हणत आपले राजकीय बॉस सुनील तटकरे यांच्या भरवशावर असलेले सुधाकर घारे यांची ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे तिकीट नाकारून निराशा केली असल्याने अख्या राष्ट्रवादीने सामूहिक राजीनामे देत तटकरेंना लांबूनच हात दाखवला आहे.आता सुधाकर घारेंच्या रूपाने त्यांना तगडा उमेदवार गमवावा लागला.तटकरे यांचे उजवे हात असलेले सुरेश लाड यांची उणीव भरून काढणारा नेता म्हणजे सुधाकर घारे यांच्याकडे पाहिले जात होते घारेंच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कर्जत खालापूर मध्ये सुफडा साफ झाला आहे.
ज्यावेळी घारे आणि त्यांचे सहकारी उमेदवारी साठी पक्षाचा राजीनामा देणार हे उघड झाले त्यावेळी तटकरेंनी घारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मनधरणी केली असावी पण या मनधरणीत काय अटी आणि शर्ती होत्या यांचा तपशील मिळू शकला नाही.घारे यांना एखाद महामंडळ किंवा विधानपरिषद यांची ऑफर झाली का? तशी ऑफर झाली नसेल तर तटकरे यांनीच घारे यांना तिकीट मिळत नसल्याने निवडणूक लढण्यासाठी फुस लावली असावी अशी शंका घेण्यास वाव आहे.दत्ता मसुरकर यांच्यासारखे प्रभावी नेतृत्व घारेंच्या पाठीशी असताना झाडून साऱ्याच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी राजीनामे देणे ही बाब अधोरेखित होऊन शंका घ्यायला वाव मिळतो. महायुतीतून विधानसभेचे तिकीट हे शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना जाणार हे सर्वश्रुत असताना सुधाकर घारे यांना प्रचंड आशावादी ठेवत कर्जत विधानसभेवर तसा दावा केल्याच्या बातम्याही माध्यमात पेरल्या गेल्या.मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात राजकीय संघर्ष उभा असल्याने आपल्या राजकीय खेळीत घारे यांच्या सारखा पत्ता वापरून थोरवे यांच्यावर राजकीय वचपा काढता येईल.म्हणूनच की काय सुधाकर घारे यांना गाफील ठेऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीची तिकीट नाकारून अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना प्रवृत्त केलं असावं अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय.सुधाकर घारे यांच्या नवीन राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि त्यावेळी घारेंनी जे शक्तिप्रदर्शन केलं ते फक्त आणि फक्त विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी होत असल्याचे त्यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लक्षात आल्याने मात्र त्यांनी घारेंना राजीनाम्यापासून थोपवू शकले नाहीत.तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असल्याने घारे यांना एखादं महामंडळ किंवा विधान परिषदेत घेता आलं असत .रायगडात त्यांना राष्ट्रवादी पक्ष मजबूत करता आला असता पण ते तसे करू शकले नाहीत कारण त्यांना राजकीय वचपा काढायचा आहे.त्यामुळे सामूहिक राजीनामे हे इतकं सोप्पं नसत पण तटकरे यांनी घारेंसाठी सोप्पं केलं.आणि सुरेश लाड यांना पण त्यांना दाखवून द्यायचं आहे की,कर्जत खालापूर मध्ये लाडांशिवाय राष्ट्रवादी पक्ष वाढवू शकलो असे दुहेरी पक्षी एका दगडात तटकरे यांना मारायचे आहेत.कर्जत खालापूर तालुक्यातील पदाधिकारी यांनी राजीनामे देताना ज्या पक्षाकडून आपल्याला तिकीट नाकारलं गेलं त्या राष्ट्रवादी पक्ष आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर आगपाखड केली नाही.ज्यावेळी ज्या पक्षातून एखादा पदाधिकारी पक्ष सोडतो त्यावेळी पक्ष नेतृत्वावर आरोप करूनच पक्षाबाहेर पडतो.उदा.द्यायचे झाल्यास माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी सोडली त्यावेळी त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर टीका करत राजीनामा दिला मात्र घारेंच्या बाबतीत तस झालेले नाही.निवडणुकी नंतर सुधाकर घारे पुन्हा राष्ट्रवादीत जातील हे यावरून स्पष्ट आहे.
घारे आणि तटकरे यांची घनिष्ठ मैत्री!!!
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि तसा तो मित्रही नसतो.सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांच्या मैत्रीचे गोडवे अजूनही गायले जातात मात्र आता दोघांमधून विस्तव जात नाही. तटकरेंनी घारेंना अप्रत्यक्षरीत्या मोलाची मदत केली असल्याचे त्यावेळी बोललं जातं होत.शिवाय करोना काळात किराणा सामान,पाणी टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा,अनेक छोटे मोठे समाजयोगी कार्यक्रम राबवण्यात घारेंना तटकरे यांनी मोलाची मदत झाली असल्याचे बोलल जातंय.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies