संतोष दळवी - कर्जत
विधानसभा निवडणूक काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कर्जत पोलिसांनी कडाव, कशेळे आणि कर्जत शहरात आदी ठिकाणी रुट मार्च काढला.आगामी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी कर्जत पोलिसांनी आतापासूनच कंबर कसली आहे.मतदारांना निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून कर्जत येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते महावीर पेठ ते जकात नाका,जकात नाका ते लोकमान्य टिळक चौक कर्जत असा रूट मार्च करण्यात आला.कडाव गाव बाजारपेठ ते वेलकम हॉटेल कडाव आणि कशेळे गाव ते बाजारपेठ आदी भागात पोलिसांनी रूट मार्च काढला.
या रूट मार्च मध्ये कर्जत पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलिस अधिकारी धुळा टेळे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली
पाच अधिकारी,सत्तरा पोलीस अंमलदार आणि सत्तेचाळीस सीआयएसएफचे जवान उपस्थित होते.