Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा २.०' मोबाईल ॲप

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी 'सुविधा २.०' मोबाईल ॲप
 
महाराष्ट्र मिरर टीम 

भारत निवडणूक आयोगाने  'सुविधा २.०' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार आहेत.  यापूर्वी फक्त ऑनलाईन पोर्टलवरच अर्ज सादर करता येत होते, पण आता नवीन अ‍ॅपद्वारे सर्व प्रक्रिया मोबाईलवरून करता येणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
 सुविधा २.० हे मोबाईल ॲप वापरण्यास सहज आणि अधिक सुरक्षित आहे. या अ‍ॅपच्या खास वैशिष्ट्यांमध्ये उमेदवारांना अर्ज डाउनलोड करणे, प्रचारासंदर्भातील परवानग्या मागवणे, अर्ज केलेल्या परवानगी संदर्भात सद्यस्थिती जाणून घेणे आणि मंजुरीची प्रत डाउनलोड करणे आदी बाबी समाविष्ट आहेत. या अ‍ॅपमध्ये नामनिर्देशन प्रक्रिया, निवडणूक वेळापत्रक आणि निवडणूक आयोगाच्या ताज्या अद्ययावत सूचना व आदेश देखील उपलब्ध असतील.
 हे अ‍ॅप अँड्रॉइडसाठी गुगल प्ले स्टोरवर https://play.google.com/store/apps/details... यावर आणि आयओएससाठी ॲपल ॲप स्टोरवर https://apps.apple.com/app/suvidha-candidate/id6449588487 या लिंकवर उपलब्ध आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies