ओंकार दळवी - कर्जत
मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयातील कर्जत रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील व शहर हद्दीतील विद्यार्थ्यांना नवीन फौजदारी कायदे 2023 चे प्रशिक्षण व कायदा साक्षर व सायबर सुरक्षा या अनुषंगाने शाळेत व्याख्यान आयोजित करण्यात आले.
पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांचे आदेशानुसार , मा.पोलीस उप आयुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 04/10/2024 रोजी सकाळी 11.00 ते 12.15 वाजे पर्यंत अभिनव ज्ञान मंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज शाखा गौळवाडी कर्जत जि. रायगड एकूण 155 विद्यार्थ्यांना कर्जत रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे व पोहावा/राज बागुल पोशि/ मोहिते, अजय शिर्के, महिला पोलीस हवालदार/ शुभांगी देशमुख,वर्षा गुंजाळ, वर्षा काळे महीला पोलीस शिपाई काळे असे नवीन कायद्याचे प्रशिक्षण सत्र व कायदा साक्षर आणि महिला सुरक्षा संदर्भात प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षण व व्याख्यान करिता अभिनव ज्ञान मंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज गौळवाडी कर्जत, जि. रायगड येथील मुख्याध्यापक/प्राचार्य रंगराव राठोड , यशवंत पाडवी, सारुकते , सौ जाधव, सौ ज्योती सरपाळे , कुमारी सोफिन व सर्व शिक्षेक्तर कर्मचारी आणि पालक प्रतिनिधी उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक सौ जाधव यांनी केले तर राज बागुल यांनी आभार मानले.
. प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये उपस्थित प्राध्यापक यांनी भारतीय न्याय संहिता 2023 , भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 व भारतीय साक्ष अधिनियम 2023 बाबत उपस्थित अधिकारी विद्यार्थ्यांना अंमलदार/ पालकांना मार्गदर्शन करुन नवीन व जुने कायदयांची तुलनात्मक बदलाची माहिती चांगल्या प्रकारे करून दिली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना यांना नवीन कायदे याबाबत मार्गदर्शन केले. सदर व्याख्यान मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना अधिकारी व अंमलदार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे समाधान केलेले आहे.