संतोष दळवी - कर्जत
महायुतीचे कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचा सद्या त्यांच्या मतदार संघात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी हायटेक प्रचार सुरू असून सर्व उमेदवारांमध्ये त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.
वैयक्तिक प्रचारासोबत त्यांचा इलेक्ट्रॉनिक प्रचार सुरू केला आहे.गावोगावी एलइडी स्क्रीन व्हॅन जाऊन आमदार थोरवे यांनी केलेल्या विकास कामांचा त्यात आढावा घेतला जातो शिवाय मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आदींचा समावेश यात असतो.निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांनी अनेक मेळावे,महिलांसाठी विविध उपक्रम राबवले,घरोघरी महिलांना साडी वाटप असे उपक्रम त्यांनी राबवले असल्याने मतदारांमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
संकेत भासे ,पंकज पाटील,अभिषेक सुर्वे,हर्षद विचारे ,रोहित विचारे आणि असे काही मोजके प्रतिनिधी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना प्रचाराच गणित समजावून सांगत आहेत.कार्यकर्ते थेट मतदारांपर्यंत पोहचत आहेत.रॅली,कॉर्नर सभा,जाहीर सभा,यांचे नियोजन चालू असून प्रचारात थोरवे प्रचंड आघाडी घेतील असं बोललं जातंय.
इंस्टाग्राम आणि फेसबुक यावर महेंद्र थोरवे यांच्या पोस्टला अनेकांचे लाईक्स असतात या मीडियाचा त्यांनी पुरेपूर वापर करायला सुरुवात केली आहे."चला फॉर्म भरायला" हे कॅम्पेन चांगल गाजलं.विविध गावात राबवलेली विकास कामे आणि त्यात गावातील मतदारांना घेऊन ही कामे गावकऱ्यांच्या कशी फायद्याची आहेत त्याच गावकऱ्यांच्या तोंडून हे व्हिडिओ त्यांच्या चाहत्यापर्यंत पोहचवण्यात आले.डिजिटल मिडिया बरोबर प्रचारगीते यांचा वापरही प्रभावीपणे नामनिर्देशन पत्र दाखल करताना मतदारांनी अनुभवला.