आमदार महेंद्र थोरवे यांनी कुस्ती जिंकली!!!
संतोष दळवी -- कर्जत
आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत आपलं आमदार पद कायम राखत अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना धोबीपछाड देत चितपट केलं .पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा काहीशा फेरीत घारे यांनी थोरवे यांना दूरवर ठेवलं होत मात्र जनतेची उत्कंठा शिगेला पोहचत असताना यांना शेवटच्या काही फेऱ्यात सुधाकर घारे यांना बऱ्याच अंतरावर ठेवल्याने काहीसा कमी लीड पार करताना घारे यांची दमछाक झाली.अखेर घारे यांना चितपट केल्याने त्यांचा पराभव झाला.तर महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांना या मैदानात बऱ्याच अंतरावर समाधान मानावं लागलं.
आमदार थोरवे यांच्या विरोधात असलेल्या महाविकास आघाडीने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा घेऊनही फारसा मतदारांवर प्रभाव पडलेला दिसला नसल्याचे चित्र होतं तर आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रचारासाठी फारस वरिष्ठ कोणी नेते सहभागी झालेले दिसून आले नसून महेंद्र थोरवे यांनी एकट्याने हा किल्ला लढविला आणि जिंकूनही आले.लोकांनी विकासाला मतदान केलं असल्याची भावना थोरवे समर्थकांनी व्यक्त केली आहे.आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकीय प्रगल्भता दाखवत महाविकास आघाडीतील नेत्यांना फोडून आपलस केलं.तिथेच थोरवे यांनी ही कुस्ती अर्धी जिंकली होती.आमदार महेंद्र थोरवे यांनी राजकारणाचं मैदान गाजवल्याने गावोगावी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला आहे.