भाई शिंदे आणि सुरेश टोकरे शिवसेनेत.
संतोष दळवी - कर्जत
दिवसेंदिवस शिवसेना शिंदे गटाकडे कर्जत मतदार संघात नेत्यांचा ओढा वाढला असून महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी आज शिवसेना उबाठा गटाला जोरदार धक्का दिला आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि माजी कृषी सभापती भाई शिंदे यांनी महेंद्र थोरवे यांच्या हस्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचे धाबे दणाणले आहेत.
सुरेश टोकरे हे शरद पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत.ठाकरे गटाचे उमेदवार नितीन सावंत यांच्यासोबत नामनिर्देशन पत्र दाखल करताना जे शक्तिप्रदर्शन करण्यात आघाडीवर होते ते आज थोरवेंच्या तंबूत गेल्याने ठाकरे गटाला थोरवे यांनी जोरदार धक्का दिला आहे.