Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आदिती तटकरेच होणार रायगडच्या पालकमंत्री?

आदिती तटकरेच होणार रायगडच्या पालकमंत्री? 
सुत्रांची माहिती !!!

संतोष दळवी - कर्जत

रायगड जिल्ह्याचे नशीब फलफललं असून महायुती सरकार मध्ये  तीनही घटक पक्षांत एकेक मंत्रिपद मिळणार असून मंत्री बनण्यासाठी आमदारांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे.
एकूण 43 मंत्रिपदे असून महायुतीला भारी भक्कम बहुमत मिळाल्याने मंत्रिपदे वाटताना कोणाकोणाची वर्णी लावावी याबाबत सरकारची दमछाक होत असताना त्यात मंत्रिपदाचा फॉर्म्युला  ठरला असून भाजप 21 ,शिंदे सेना 12 आणि राष्ट्रवादी 10 मात्र रायगडच्या राजकारणात महायुतीतील तीन घटक पक्षांना प्रत्येकी एक असं मंत्री पद मिळणार आहे.भाजपमधून उरणचे आमदार महेश बालदी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे कारण त्यांनी थेट गुजरात कनेक्शनचा वापर केला असल्याची चर्चा आहे मात्र त्यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागेल अशीही चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारी मताधिक्याने आलेले पेणचे आमदार रवी पाटील हे सुध्दा लॉबिंग करत असल्याचे सूत्रांकडून कळतंय.
तर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना ही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जातेय. दोन वर्षापासून त्यांनी मंत्री होण्याचा कोट कपाटात ठेवला आहे तो आता बाहेर काढण्याची वेळ आली असून त्यात त्यांना राज्यमंत्री पदापर्यंत मजल जाणार आहे.तर श्रीवर्धन मतदार संघातून मोठ्या फरकाने निवडून आलेल्या आदिती तटकरे यांना ही मंत्रिपद मिळणार असून तेही कॅबिनेट दर्जाचे .खासदार सुनील तटकरे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्याकडे आपसूकच कॅबिनेट दर्जाचे मंत्री पद जाणार हे उघड असून त्यांच्याकडे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राहील असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अदिती तटकरे यांचा नामांकन अर्ज दाखल करताना आमदार भरत गोगावले हे उपस्थित होते आणि भरत गोगावले यांच्या साठी सुनील तटकरे यांनी प्रचाराची जाहीर सभा घेतली होती त्यामुळे भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात बऱ्यापैकी पॅचअप झाले असल्याचे बोलले जातेय.अदिती तटकरेंना पालकमंत्री केल्यास शिंदे गटामध्ये नाराजी उदभवेल यावर माहिती देताना ,आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती,नगरपालिका निवडणूक पाहता शिंदे गटाची समजूत काढली जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies