क्षुल्लक माणसाच्या वक्तव्यावर नो कमेंट
थोरवेंच्या टिकेनंतर तटकरेंनी केली हेटाळणी
संतोष दळवी - कर्जत
महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे बंडखोर उमेदवार सुधाकर घारे यांना राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे अप्रत्यक्षरीत्या मदत करत असल्याचा आरोप करून तटकरे यांच्यावर सडकून टीका केली असल्याचे मुंबईत या विषयी पत्रकारांनी सुनील तटकरे यांना छेडलं असता ते म्हणाले,"क्षुल्लक माणसाच्या वक्तव्यावर मला प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटतं नाही अशा शब्दात त्यांनी पलटवार केला आहे.२०१९ सालापासून रायगडात शिवसेना आणि राष्ट्रवादी संघर्ष सुरू झाला असून सत्तेत हे दोन्ही पक्ष एकत्र बसूनही वाद मिटता मिटेना मात्र दिवसेंदिवस हा राजकीय संघर्ष टिपेला पोहचत आहे.